Followers

Thursday, 9 June 2016

माजी सैनिक गहिवरले

स्वतः चा अनुभव बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकात वाचून माजी सैनिक गहिवरले...@ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮.१९८२ सालचा मार्च... कारगिलच्या पाकव्याप्त काश्मिरची नियंत्रण रेषा... पहाडांवरील बर्फ वितळू लागलेला... पाकच्या कुरापती वाढू लागल्या... सीमा सतत धगधगत... इथं तैनात होता मराठा लाईट इंन्फट्रीचा एक जवान... ज्याची आई गावी आजारी... अंतरूणाला खिळून... लेकराच्या वाटेला डोळा लावून...
पण सहकारी सुट्टीवर... जवानाला रजा भेटत नव्हती... आईच्या आठवणीत दिवस जात नव्हता.. एक सहकारी सुट्टीवरून परतला.. आईची धाकधूक वाढल्याचा सांगावा घेऊन... जवान सकाळी डुटीवरून उतरला.. मेजरसाहेबांना भेटून रजा घेतली... गावाकडच्या प्रवासात रस्ता तुटता तुटेना... गावात पोचला... त्याला पाहून गावाचा रहाटगाडा थांबला... जोतो चुपचाप त्याच्या मागे चालू लागला... हातातल्या जाडजुड ट्रंका तिथच टाकल्या.. आईच्या ओढीने धावत सुटला... वाड्याच्या सोफ्यात आला... बहिणींच कोह्याळ गळ्यात पडलं... घरात गोडाचा निवद शिजत होता... पण त्याची नजर आईला शोधतेय... "मला नातू बघायचाय' म्हणणारी... माझी आई कुठून येतेय का?
"पण थोडा उशीर झाला'
हा अनुभव आहे. *माजी सैनिक हरी दत्तू नाझरे, मु.पो.आमणापूर, ता.पलूस, जि.सांगली* यांचा. त्यांचा मुलगा संदीप याने या अनुभवाचे चित्रण आपल्या कथेत केले.
यंदा *महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ 'बालभारती'च्या इयत्ता सहवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात *'पण थोडा उशीर झाला'* हा पाठ समाविष्ट झाला आहे.
आज बालभारती कडून पोस्टाने हे पुस्तक आले.
स्वतः चा अनुभव 'बालभारती' पुस्तकात वाचताना या माजी सैनिकाचे मन पुन्हा आईच्या आठवणींनी भरून आलेले दिसले...

1 comment:

  1. Casino - Dr.MD
    With a huge selection of online games, progressive 전라남도 출장마사지 jackpot slots, and a world of casino 여주 출장샵 slots, there are more ways to play 용인 출장안마 than a game. Visit 서울특별 출장샵 our website to play! 상주 출장마사지

    ReplyDelete